Follow us on:
+91 9422259672/ +91 9403544953 +91 8149949275/ +91 9545695119
Leading Palmist in India, Palmistry Services in India Astrology Services in India, Palmistry Services in Maharashtra,Best Palmist in Nashik Pune Mumbai

स्वागत

हस्तरेखाविज्ञान रिसर्च सेंटर मनुष्य कर्म तर करितच असतो. परंतु त्याला भाग्याची साथ असेल तरच तो मनुष्य यशस्वी जीवन जगतो. बर्याच वेळेला तो कर्म करीत असताना भाग्य साथ देत नाही. अशा वेळी त्याला आपल्याला आपले भाग्य केव्हा सात देईल हे पाहण्याची आवश्यकता असते. अशा वेळी आपले भविष्य हस्तरेषा शास्त्राद्वारे अचूक पाहता येते. आयुष्यात भूतकाळातील घडलेल्या घटना व येणार्या संकटंची सूचना हस्तरेषाद्वारे मिळते. तसेच आपल्या मुलांनी कोणत्या प्रकारचे शिक्षण घ्यावे हे आपण हातावरून सांगू शकतो. त्यानुसार मुलांना जीवनक्रम आखणे सोईचे जाईल त्यामुळे यशही लवकर मिळते. तसेच मुलगा व मुलगी यांचे एकमेकांशी पटेल किंवा नाही हे आपण हस्तरेषेवरुन सांगू शकतो. हातावरील सूक्ष्मरेषाद्वारे रोगाचे निदान होते. मानसिक शास्त्राचा अभ्यास हातावरून चांगल्या प्रकारे होतो. तसेच कमी बुद्धीचे मुळे हस्तरेषेवरुन शोधता येतात व त्यांच्या बुद्धीचा योग्य विकास व्हावा म्हणून योग्य ते उपचार करण्यास मदत होते. हातावरून गुन्हेगारी वृत्तीही समजते. व्यवसाय मार्गदर्शनही होते. आयुष्यात पुढे येणार्या संकटांची सूचना हस्तरेषेवरुन मिळते. हाताचे परीक्षण करताना हातावरील घटनांचा काल ठरवता येतो. कोणतीही घटना वयाच्या कोणत्या वर्षात होणार याचा अचूक अंदाज हातावरील रेषाद्वारे करता येतो. उदा. हातावर परदेशगमन अगर नोकरी बढती, अपघात, विवाह या गोष्टी दाखविल्या असतील तर त्या गोष्टी अमुक वर्षी होणार हे सांगता येते. त्यासाठी हातचे ठसे घेऊन कालमान काढता येते. आपल्या हाताचे परीक्षण करून आपला भूतकाळ, वर्तमानकाळ व भविष्यकाळ आपल्या वयानुसार जाणून घ्या. आपल्या हाताचे नमूना परीक्षण कसे होईल हे पाहायचे झाल्यास नमूना परीक्षण ( सॅंपल पाम रीडिंग )मध्ये पहा.

Jh- vfuy dqekor

hit counter
© copyrights 2016. Design & Developed by: Chittaranjan